भारताचे कणखर नेतृत्व पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दूरगामी निर्णयांमुळे आपला देश विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत आहे. जागतिक पटलावर भारत एक शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्र म्हणून गतीने पुढे जात आहे. स्वतःला प्रधान सेवक म्हणविणारे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर, खंबीर नेतृत्वात घडत आहे सध्याचा विकसित भारत, समृद्ध भारत, सामर्थ्यवान भारत !
सत्ताकाळाच्या अगदी प्रारंभापासून राष्ट्र प्रथम हा संकल्प घेऊन त्यांनी देशवासीयांच्या हितासाठी अहोरात्र कार्य केले. प्रत्येक भारतीयाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून दमदार पाऊले उचलली. बलाढ्य आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या उद्दामपणाचा धीराने, संयमाने मुकाबला केला. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे कार्य सर्वव्यापी आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत, त्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलात भारतीयांचे उज्ज्वल भविष्य सामावले आहे. त्यांच्याच कार्यकाळात आजघडीला १५० कोटी भारतवासी सुवर्णकाळ अनुभवत आहेत.
आजपर्यंतच्या कार्यकाळात पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी अर्थकारण, समाजकारण, राजकारण, उद्योग-व्यवसाय, राष्ट्रसंरक्षण, भारतीयांचे जनजीवन, धर्म जागरण, संस्कृती रक्षण अशा विविध पातळ्यांवर कठोर, कणखर निर्णय घेतले आणि प्रगत, विकसित, मजबूत भारताच्या प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला. देशातील १५० कोटी जनतेच्या चेहऱ्यावर आज जे समाधानाचे, स्वाभिमानाचे हास्य दिसते ते फक्त आणि फक्त श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे. जागतिक पातळीवर आज आपला भारत देश ताठ मानेने उभा आहे. जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी प्रबळ अर्थव्यवस्था बनली आहे. जे कुणालाही जमले नाही ते श्री. नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखवले, जनसेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण ही तत्वे अंगीकारून. त्यांच्या प्रत्येक कृतीने भारतीयांच्या जनमानसावर ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाने भारतीयांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे.
त्यातील काही धडाकेबाज निर्णय असे :
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी देशाच्या विकासासाठी, विविध राज्यांच्या प्रगतीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन, कार्याला दिशा दिली आहे. विविध राज्यांमध्ये विकास कामांचे उद्घाटन आणि भविष्यातील कार्याची पायाभरणी केली आहे. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीचे नवनवीन टप्पे ओलांडत आहे.