महाराष्ट्राची ओळख आज देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून होते. या प्रगतीमागे ठाम नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व आहे देवाभाऊ. राज्याचा कारभार उत्तमरीत्या सांभाळत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.
देशातील सर्वात तरुण महापौर ते मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास देवाभाऊंनी केला. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत त्यांनी आपला राजकीय ठसा उमटवला आहे. ही वाटचाल केवळ पदांची नाही, तर जनतेच्या मनात घर करणाऱ्या विचारांची, कामगिरीची आणि दृष्टीकोनाची आहे.
विकासाचा नवा मंत्र
देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शिक्षण, आरोग्य, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात पायाभूत बदल घडवून आणले. विदेशी गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग खुला केला. ग्रामीण आणि शहरी भागात विकासाचा समतोल राखत राज्य आदर्शवत बनवले.
सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व
दीर्घकाळ प्रस्थापितांच्या मक्तेदारीतून सामान्यांना मुक्त करत, देवाभाऊंनी अठरापगड जातींना मुख्य प्रवाहात आणले. सामाजिक न्याय आणि समानतेच्या पायावर उभारलेलं त्यांचं नेतृत्व आज समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात प्रभावी ठरतं आहे.
सत्तेत असतानाही देवाभाऊंनी सर्वसामान्यांचा आवाज ऐकून तो सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचवला. वंचित, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देणे हा त्यांचा प्रमुख ध्यास ठरला. त्यामुळेच ते केवळ मुख्यमंत्री नसून, लोकांच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक झाले आहेत.
महाराष्ट्र कल्याणाचा वसा
देवाभाऊ महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध आहेत. नव्या विचारांनी, नव्या निर्धाराने आणि नव्या दिशेने राज्य पुढे नेण्याचा वसा त्यांनी स्वीकारला आहे. महाराष्ट्र धर्म जपत सर्वांसाठी न्याय, समानता आणि प्रगती यांची हमी देणारे ते खरे जननेते आहेत.
देवाभाऊ राजकारणातील नाव नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचं, सर्वसमावेशकतेचं आणि लोकाभिमुख नेतृत्वाचं जिवंत उदाहरण आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे आणि त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गदर्शक आहे.