गंगापूर - आओ गाव चलो अभियानांतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे गंगापूर तालुक्यातील धामोरी गाव दत्तक घेण्यात आले आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहचवण्याच्या हेतूने नुकतेच या गावात भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात अनेक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास देवगिरी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी देवगिरी बँक व आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने धामोरी ग्रामपंचायतीला महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्यात आली.
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) आओ गाव चलो अभियानांतर्गत दत्तक गाव संकल्पनेतून गंगापूर तालुक्यातील धामोरी (बु.) येथे महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी चेअरमन डॉ. श्री. बिपिन पटेल, व्हाईस चेअरमन डॉ. श्री. अनिल पाचनेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. श्री. रवींद्र कुंटे, अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर डॉ. श्री. यशवंत गाडे, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे, डॉ. श्री. टाकळकर, डॉ. श्रीमती उज्वला दहिफळे,श्री. सुभाष शेळके, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. कृष्णा सुकासे पाटील, सरपंच श्रीमती ललिता गौतम किर्तीशाही, माजी सरपंच श्रीमती आशामती गोरख शेळके, श्री. गोरख शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. श्री. बिपीन पटेल म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व प्रसिद्ध डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)तर्फे आओ गाव चलो अभियानांतर्गत दत्तक गावात प्रत्येक घटकातील रुग्णांना औषधोपचारासह मोफत आरोग्य सेवा देणार आहेत. या उपक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यायला हवा. यावेळी डॉ. श्री. सुधाकर शेळके, श्री. गोरख शेळके, ग्रामपंचायत आणि गावकरी यांच्या आग्रहाने धामोरी हे गाव एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले. त्यात प्रत्येकी तीन महिन्यातून एक आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे डॉ. श्री. यशवंत गाडे यांनी सांगितले.
देवगिरी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे म्हणाले की, ग्रामीण भागातील रुग्णांची सवय आहे की आजार अंगावर काढायचा आणि जास्त झाल्यावर शहरातील रुग्णालयात उपचार घ्यायचे. आजकाल नैसर्गिक आहार, खानपान, जीवनशैलीत खूप मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यासाठीच आयएमएच्या माध्यमातून आओ गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी देवगिरी बँक व आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने धामोरी ग्रामपंचायतीला महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्यात आली. यावेळी आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. गावातील सर्व शालेय विद्यार्थी, पुरुष आणि महिला यांची प्रथम आरोग्य तपासणी करून नंतर उपचार आणि औषधी वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. श्री. संजय खंडागळे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनुभवी डॉक्टरांसह धामोरी गावचे उपसरपंच, सर्व सदस्य, श्री. ज्ञानेश्वर म्हस्के, सहकार सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. तुकाराम शेळके, श्री. आशिर्वाद रोडगे, श्री. सुनील मुळे, श्री. शिवा शेळके, श्री. संदीप केदारे, श्री. भरत वल्ले, श्री. नवनाथ वल्ले, श्री. सोमनाथ कर्डिले, श्री. शांतीलाल साळवे, श्री. गौतम कीर्तीशाही, श्री. बबनदादा शेळके, श्री. बंडू शेळके, श्री. तुकाराम चव्हाण, श्री. गोकुळ शेळके, श्री. नाना शेळके, श्री. भगवान शेळके, श्री. विठ्ठल शेळके, श्री. नारायण गावंडे, शिक्षक श्री. काळे सर, श्री. बबन शेळके, श्री. रामेश्वर शेळके, श्री. विजय उगले, श्री. रवी कावळे, श्री. सोपान शेळके, श्री. विष्णू शेळके, श्री. गणेश शेळके, श्री. संदीप वल्ले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.